जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास भीषण अपघात झाला. एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने भेट दिली व त्यांची विचारपूस केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघातस्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली.