राहुल गांधींवरील अपात्रतेच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभरात संकल्प सत्याग्रह आंदोलन पुकारलं आहे. दिल्लीत राजघाटावर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रियंका गांधींनी घराणेशाहीवर बोलताना भगवान श्री राम यांचा उल्लेख केला. आपल्या कुटुंबाच्या संस्कारासाठी लढणारे पांडव, श्री राम घराणेशाही मानणारे होते का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला