Budget Session: हातात बजेटचा डोंगर घेत विधानभवनाच्या पायर्‍यांवर अर्थसंकल्पाविरोधात विरोधक आक्रमक

2023-03-15 0

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. खोदा पहाड, निकला चुहा... शेतकऱ्यांवर अन्याय करणार्‍या सरकारचा धिक्कार असो... बजेटचा डोंगर, निघाला उंदीर...अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत अर्थसंकल्पाविरोधात जोरदार निदर्शने केली.

Videos similaires