कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपाला झटका देत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यश मिळेल अशा सामान्यांच्या प्रतिक्रिया होत्या. मात्र मला स्वतःला खात्री नव्हती, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी धंगेकरांचं कौतुकही केलं आहे. पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.