Kasba byelection Results: "ही माणुसकी आहे का?..."; अजितदादांचा भाजपाला सवाल | Ajit Pawar

2023-03-02 0

कसबा निडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून आता भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर शिंदेंनी केलेल्या विधानाची आठवण करून देत त्यांना चिमटा काढला आहे. शिवाय भाजपाने कशाप्रकारे आजारी असतानाही खासदार गिरीश बापट यांना प्रचारात उतरवलं याचाही उल्लेख करत अजित पवारांनी टीकस्त्र डागलं

Videos similaires