कर्नाटक विधानसभेत वीर सावरकरांचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झाला आहे. विधानसभेच्या सभागृहात सावरकरांचा फोटो लावण्यास काँग्रेस आमदारांनी आक्षेप घेत गदारोळ केला. एवढेच नाही तर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आमदारांनी निदर्शने केली. काँग्रेसच्या विरोधावर भाजपा नेते प्रल्हाद जोशी आणि गिरिराज सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.