सध्या सगळीकडे लगीनसराई सुरु आहे. राजकारण्यांच्या घरातही लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. नुकतंच संजय राऊत यांच्या मुलीचा विवाहसोहळा पार पडला. अनेक नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कन्या नीता हिचा लग्न समारंभ १ डिसेंबर २०२१ रोजी थाटामाटात पार पडला. या शाही विवाहसोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यासोबतच अनेक नेते मंडळींनी हजेरी लावली.
#nanapatole #wedding #Congress