50,000+ मुलांनी औरंगाबादमध्ये आज "जन गण मन" या राष्ट्रगीताचं समूहगायन करत नवा विश्वविक्रम नोंदवला. वर्ल्ड रेकॉर्डचे 'गिनीज'चे कडक नियम पाळत गारखेडाच्या विभागीय क्रीडा संकुलात विश्वकवी टागोरांच्या लेखणीतून उतरलेल्या राष्ट्रगीताचा समूहगीत गायनाचा हा विश्वविक्रम नोंदवण्यात आला. लोकमत समूहाने या अभिमास्पद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.