बलात्कार व विनयभंग या गुन्ह्यांकरीता दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कठोर शिक्षेची तरतूद करूनही लिंगपिसाटांच्या कामुकतेला वेसण बसलेली नाही हेच दुर्दैवाने वास्तव असल्याचे पोलिसांचे मत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या वर्षभरात ठाणे आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमध्ये १८ वर्षावरील मुली तसेच महिलांवर अत्याचाराचे २०२ गुन्हे दाखल झाले