शिर्डी : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर मुंडे यांचा शॉल, साई मूर्ती, देवून संस्थानच्या वतीनं सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर धनंजय मुंडे पुढील दौऱ्यासाठी रवाना होताना, अचानक एक 70 वर्षीय आजीबाई त्यांच्या गाडीजवळ आल्या. ते पाहून धनंजय मुंडे यांनी गाडीतून उतरून आजीचा हातात हात घेत विचारपूस केली आणि आजीच्या पाया पडून दर्शन घेतलं. यावेळी अजीनेही धनुभाऊ कसा आहे तू जेवण केलं का? तबेतची काळजी घे असी विचार पूस केल्यानं मुंडेनी आजी कुठून आलाय तुम्ही आजीने बीड जिल्ह्यातील कोठारबन येथील असल्याचं सांगत आपण भाऊबंद आहे माझे नाव शांताबाई मुंडे आहे असे सांगितल्यानंतर धनंजय मुंडे आनंदी होत आजी बरोबर फोटो घेण्याचाही मोह यावेळी त्यांना आवरला नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीचा पार्श्वभूमीवर साईंच्या शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर पार पडतय. या शिबिराला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावलीय.