कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यासाठी अधिक काळ लागला. यानंतर काँग्रेसने कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. परंतु या उमेदवारीवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याने थेट उमेदवार बदलून छत्रपती घराण्यातील सदस्याला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु ज्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली त्यांनीही माघार न घेता विधानसभेत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.