कोल्हापुरच्या कागल तालुक्यातील एकोंडी गावात सकल हिंदू समाजाच्यावतीने दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडचा व्हिडिओ पाहून तुम्हीही कौतुक कराल. मराठी संस्कृतीचे दर्शन आणि एकोपा दाखविण्यासाठी या दौडचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संस्कृती, इतिहासातील महत्त्वाच्या घटना, बारा बलुतेदारी यांचे दर्शन पारंपारिक वेशभूषा करून गावकऱ्यांनी दाखविले आहे.