महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजीराजे यांनी मुंबईजवळील अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झालेले शिवस्मारक शोधायला चला, अशी हाक आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्मारकाची किती कामे झाली असून काम कुठे अडले हे स्पष्ट केले.