कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. वारणा पट्ट्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीचे पाणी पुलावर आले आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.