विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून जळगावात महायुतीच्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू झाल्याचं दिसतंय. मंत्री अनिल पाटलांनी महायुतीचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला सांगताच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये फटाके वाजू लागलेत.