आगामी लोकसभा निवडणुक पाहता कोल्हापुरात आता उमेदवारांची नावे चर्चिले जात आहेत. परंतु उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याचा निर्णय जागा वाटप झाल्यावर होणार आहेच. त्याआधीच कोल्हापुरच्या जागेबाबत नवा चेहरा समोर येणार असल्याच्या चर्चेला शिक्कामोर्तब केले ते संभाजीराजे यांच्या विधानाने..