मुंबई मेट्रो- ३ हा कुलाबा- कफ परेड ते आरे असा तब्बल ३३.५ किलोमीटर्सचा संपूर्णत: भुयारी असा मेट्रो मार्ग आहे. भूगर्भीय आव्हानं ही सर्वात मोठी होती. त्यासाठी प्रत्येक ५० मीटर्स अंतरावर बोअर खणून भूगर्भातील खडकांचे नमुने गोळा करण्यात आले. त्या नमुन्यांचा अभ्यास करून तब्बल १७ टनेल बोअरिंग मशिन्स एकाच वेळेस मुंबईच्या भूगर्भात कार्यरत करून भुयारी खणून त्यांची जोडणीही करण्यात आली. ही टीबीएम मशिन्स हा तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कारच आहे. समोरच्या बाजूने कटरच्या माध्यमातून खडक फोडत मशीन पुढे सरकत असताना मागच्या बाजूस खणलेल्या भुयाराच्या संरक्षक भिंती उभ्यारण्याचे तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी लायनिंगचे कामही एकाच वेळेस करण्यात आले. त्यामुळे वेळही वाचला आणि एकच वेळेस दोन कामेही पार पडली! आता येत्या सहा महिन्यात या मेट्रो३ च्या पहिला मार्ग आरे ते बीकेसी मुंबईकरांसाठी खुला होणे अपेक्षित आहे. मेट्रोच्या एमआयडीसी भुयारी स्थानकामध्ये जाऊन घेतलेला एक वेगळा शोध...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #mumbaimetro #metro3 #metroproject #mmrcl #mumbaimetr3