1980 साली काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अवकाश, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर व निसर्ग ऊर्जा खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाची धुरा जळगावातील तेव्हाचे खासदार विजय नवल पाटील पाटील यांच्याकडे दिली होती. चंद्रयान 3 मोहीम फत्ते झाल्यानंतर माजीमंत्री विजय पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.