भाजपकडे वॉशिंग मशीनपेक्षा भारीवाले मशीन आहे. त्यामुळे कितीही घाणेरडे, गलिच्छ, भ्रष्टाचाराचे आरोप असलेला व्यक्ती त्यात घातला तर तो अगदी स्वच्छ होऊन बाहेर पडतो व त्याला मंत्रिपद दिलं जातं. नवाब मलिकही जर भाजपमध्ये गेले तर तेही स्वच्छ होऊन बाहेर पडतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावात दिलीय. नवाब मलिक यांच्यावर शरद पवार यांचे अनंत उपकार आहेत. त्यामुळे ते शरद पवारांसोबतच राहतील. परंतु भाजपने जर त्यांना ऑफर दिली असेल तर तेही वॉशिंग मशीनमधून धुवून स्वच्छ होतील, असेही खडसे म्हणाले.
#LokmatNews #MaharashtraNews #EknathKhadse #Politics