"सरकारमध्ये तिसरा भिडू आल्यामुळे खाते वाटपात निश्चितच थोडी गडबड होणार आहे. त्यामुळे खाते वाटपात थोडा विलंब होतोय", असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलंय. अर्थ खात्याच्या बाबतीतही वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असंही ते म्हणालेत. खाते वाटपावर कोणाचीही नाराजी नसेल. पण आता सर्व वावड्या उठवल्या जात असल्याचंही त्यांनी शेवटी सांगितलं.