मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल...

2023-07-10 3

धुळ्याला 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मुंबईहून विमानाने निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खराब हवामानाचा फटका बसला. हवामान खराब असल्याने मुख्यमंत्र्यांचे विमान धुळे ऐवजी जळगाव विमानतळावर उतरलं. त्यानंतर दोन्ही नेते साध्या वाहनाने जळगावहून धुळ्याला रवाना झाले. त्यामुळे व्हीआयपी सुरक्षेची ऐशी तैशी झाल्याचे पाहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाल्याने प्रशासकीय यंत्रणेचीही चांगलीच तारांबळ उडाली होती.

Videos similaires