तत्कालीन शूर्पारक (सोपारा) या बंदरामुळे मुंबईत समृद्धीचा जो ओघ सुरू झाला, त्याचा आणि बौद्ध धर्माचा महाराष्ट्रातील प्रवास समांतर जाणारा आहे. बौद्ध हा नागर धर्म आहे आणि सोपारा हे तत्कालीन भारतातील मोठे बंदर होते. सोपाऱ्याच्या या सर्वात प्राचीन स्तूपाशी निगडीत अशा कथा- दंतकथाही आहेत. भगवानलाल इंद्रजी यांना सोपाऱ्याच्या या उत्खननात सापडलेल्या पुरातत्वीय बाबीही सध्या मुंबईतच पाहायला मिळतात.