Rapper Ram Mungase: राम मुंगासेला अटकपूर्व जामीन मंजूर; पहिल्यांदाच मांडली भूमिका
रॅपर राम मुंगासे याचा "५० खोके" हे रॅप गाणं प्रसिद्ध झालं होतं. यावरून राम मुंगासेवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र आता रामला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. त्यानंतर त्याने या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. राम मुंगासेचं गाणं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केलं होतं. त्यानंतर त्याची बरीच चर्चा रंगली होती.