सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाणार असल्याचं ट्वीट केलं आहे. या ट्वीटनंतर चर्चांना उधाण आलं आहे. अंजली दमानियांनी हा दावा करताना त्यांनी माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवार विरोधी पक्षनेते असल्याची भूमिका अजिबात व्यवस्थित बजावत नसून त्यांची भाजपासोबत जवळीक दिसत आहे. असे विधान दमानियांनी केले. त्याचबरोबर 'भाजपा यामध्ये ईडीचा सर्रास गैरवापर करत दबाव निर्माण करतेय' असा आरोपही त्यांनी केलाय.