Shambhuraj Desai: "उद्धव ठाकरे लोटांगण घालत...": शंभूराज देसाईंची बोचरी टीका

2023-04-12 2

ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिलव्हर ओकवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचे नेते तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी राज्यासह देशातील अनेक मोठे नेते मातोश्रीवर आल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. परंतु आज उद्धव ठाकरे काका मला वाचवा म्हणत सिल्व्हर ओकवर लोटांगण घालत शरद पवार यांची भेट घेण्यास गेल्याचे पाहून राज्यातील जनतेला खेद वाटत आहे, अशा शब्दांत शंभूराज देसाईंनी ठाकरेंना टोला लगावला.

Videos similaires