Girish Mahajan: गिरीश महाजन यांनी घेतली पारस दुर्घटनेतील जखमींची भेट; पीडितांना मदत जाहीर
अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातल्या पारस येथे रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसामुळे झाड पडून ७ जणांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील जखमी व्यक्तींची मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली आणि जखमी रुग्णांची विचारपूस केली.