Sanjay Raut on Shinde: बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा उल्लेख करत संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्र
गद्दारांना रस्त्यावर पकडून मारलं पाहिजे, हा बाळासाहेबांचा विचार होता. हाच विचार आता राज्यातील जनता अंमलात आणेल, अशी भीती सध्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० गद्दार आमदारांना आहे, त्यामुळेच त्यांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरण्यात आली आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरूनही शिंदे गट भाजपाला लक्ष्य केलं.