फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावं; विखे पाटलांचा टोला
ठाण्यातील मारहाण प्रकरणानंतर शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर कडक शब्दांत टीका केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलं. यावर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. सत्ता गेल्याने इतकं वैफल्यग्रस्त होऊ नये, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.#radhakrishnavikhepatil #devendrafadanvis #udhavthakkarey #shivsena