रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत आपण राजीनामा देणार नाही, असं म्हटलं आहे. दोन मंत्री जेलमध्ये गेल्यावरही ज्यांनी राजीनामा घेतला नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? अडीच वर्ष घरात बसून काम करणाऱ्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये, अशा शब्दांत फडणवीसांनी टीका केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.