खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी देखील यावर प्रतिक्रया देत एक कुटुंबप्रमुख हरपल्याची भावना व्यक्त केली. सभागृहातील आमचा कधी अनुभव राहिला नाही, पण माणून म्हणून ते सर्वांना जिंकायचे, प्रत्येकाबद्दल त्यांना असलेली आपुलकी अनेकांना भावायची, असं निलेश राणे म्हणाले.