Girish Bapat Health Update: खासदार गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक, मंगेशकर रूग्णालयाची माहिती

2023-03-29 1

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गिरीश बापट हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. कसबा पेठ निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांना इतकं आजारी असताना भाजपाने प्रचारात का उतरवलं म्हणून टीकाही झाली होती. आता त्यांची प्रकृती खालावली आहे त्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याबाबत काही वेळाने दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात आले यावेळी खासदार गिरीश बापटांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

Videos similaires