एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द केली आहे. अॅड. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीनंतर बार कौन्सिलने हा निर्णय दिला. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप ॲड. सुशील मंचरकर यांनी केला होता. यासंदर्भातील तक्रार त्यांनी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलकडे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र बार कौन्सिलने सदावर्तेंविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली.