Rahul Gandhi PC: "मी घाबरणार नाही"; खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर व खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर भूमिका मांडली. देशात लोकशाहीवर हल्ला होतोय, त्याचा प्रत्यय आम्हाला रोज येत आहे. अदाणी आणि मोदींच्या संबंधावरून मी संसदेत प्रश्न विचारला, पुरावे देखील दिले. यासह अनेक उदाहरणं देत राहुल गांधींनी आपली बाजू मांडली. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत