Ravindra Dhangekar on Rahul Gandhi: "चोराला चोर म्हणणं वाईट आहे का?"; रवींद्र धंगेकरांचा सवाल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आक्रमक झाले असून भाजपावर टीकास्त्र डागत आहेत. आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी माफी मागूच शकत नाही, माफी त्यांच्या रक्तातच नाही. ते बोलतात ते चुकीचं नाही, असं म्हणत धंगेकरांनी राहुल गांधीना पाठिंबा दिला आहे #ravindradhangekar #rahulgandhi #congress #bjp