राज्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये देशातील कुपोषण कमी व्हावं यासाठी गर्भवती महिलांना पोषण आहार आणि बाळाच्या जन्माआधी बेबी केअर किट दिलं जातं. पण बुलढाण्यातील मोताळा तालुक्यात मात्र निकृष्ट दर्जाचे बेबी केअर किट दिले जात असल्याचा प्रकार सध्या उघडकीस आला आहे. गर्भवती महिलांना मिळणारे सामान हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहायला मिळतेय. या कीटमध्ये बाळांच्या मालिशसाठी देण्यात येणाऱ्या तेलाच्या बाटल्या तर होत्या, मात्र त्या रिकाम्या होत्या. कीटमधील साहित्य अर्धवट स्वरूपाचे असल्याने लाभार्थी संतप्त आहेत.
#Buldhana #BabyCare #GovernmentSchemes #BabyCareKit #GovernmentPolicy #BabyCareProducts #ChildDevelopment #WCD #Baby #HealthyChild #Malnutrition #Poshan #Aahar #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #MangalPrabhatLodha #Motala #Anganwadi