Manoj Bajpayee on Theater: 'इंटरनेटला कंटाळलेली पिढी आता नाटकाकडे वळतेय'; मनोज बाजपेयीची प्रतिक्रिया

2023-03-23 9

फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी बाजपेयी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, 'रंगभूमीसमोर अनेक आव्हाने आली. पण रंगभूमीवरील कलाकारांची प्रतिभा पाहिल्यास या मंचावर काम केलेले कलाकार आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे. आज ज्या ज्या शहरात जातो, तिथे नाट्यसंस्था सक्रीय झालेल्या दिसतात. त्यामुळे इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढी रंगभूमीकडे वळत आहे ही चांगली बाब आहे' अशी प्रतिक्रियाही यावेळी बाजपेयी यांनी दिली.

Videos similaires