मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावरून म्हणजेच मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरून त्यांची ठाकरी तोफ डागली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी यांसारख्या अनेक विषयांवर आपल्या खास शैलीत भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाबळेश्वरच्या 'त्या' बैठकीवरून स्पष्टीकरण दिलं. 'मी एके दिवशी उद्धवसोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो. तिथे मी त्याला बसवलो. मी उद्धवला बसवलं आणि विचारलं की तुला काय हवं आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचं आहे सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझं काम काय? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नकोस. मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही. मी विचारलं ठरलं ना? तो म्हणाला हो ठरलं. मला कारण नसताना त्रास दिला जात होता. मी बाहेर कसा पडेन यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या'