'गुवाहाटीला जाऊन आलात, आता शेतकऱ्यांची अवस्था बघा'; नुकसानग्रस्त शेतकऱ्याची शहाजीबापूंना मागणी
'गुवाहाटीला जाऊन काय झाडी, काय डोंगर म्हणणारे शहाजी बापू पाटील यांनी आता गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांची काय अवस्था काय आहे हे इथे येऊन पाहावं' असं आवाहन निफाड तालुक्यातील कुंभारी येथील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक रमेश नामदेव शेजवळ यांनी केले आहे. रमेश शेजवळ यांनी उन्हाळ कांद्याची सुमारे एक एकर लागवड केली होती. शनिवारी झालेल्या गारपिटीने कांदा पात पूर्णतः आडवी झाल्याने या कांदा उत्पादकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी आपली भावना व्यक्त करताना त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्याकडे बोट दाखवून आमच्या व्यथा जाणून घेण्याची मागणी केली आहे #shahajibapupatil #farmer #onions #production