CM Shinde: ठाण्यातील नवरात्रोत्सव मिरवणुकीत मुख्यमंत्र्याचा सहभाग; देवीचे पूजन करत रथही ओढला

2023-03-22 1

CM Shinde: ठाण्यातील नवरात्रोत्सव मिरवणुकीत मुख्यमंत्र्याचा सहभाग; देवीचे पूजन करत रथही ओढला

धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे माँ चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त आज ठाण्यात देवीच्या भव्य आगमन मिरवणुक काढण्यात आली होती. या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सहभागी होत नागरिकांशी संवाद साधला. तसेच यानिमित्ताने त्यांनी देवीचा रथही ओढला. यावेळी शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच शिवसेनेचे ठाण्यातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्तेही उपस्थित होते #shivsena #dharmaveer #eknathshinde #thane

Videos similaires