अभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांनी कोल्हापुरात होणारी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा हीचं शासनाची अधिकृत स्पर्धा असल्याच म्हटलंय. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. दिपाली सय्यद यांच्या दाव्यामुळे कुस्ती क्षेत्रात वादंग निर्माण होणार आहे. एकीकडे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी २३ -२४ मार्चला सांगलीमध्ये महिला कुस्ती स्पर्धेच आयोजन केलं आहे. त्यामुळे कोणाची महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा अधिकृत असा प्रश्न कुस्तीगीर आणि कुस्तीशौकीनांना पडला आहे.