पुण्यातील वारजे भागातील अहिरे गावात बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचं वातावरण होतं. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्या या परिसरात असल्याची माहिती मिळताच आमची टीम पुढील काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली व बिबट्याला जेरबंद केलं.