Jitendra Awhad: धीरेंद्र शास्त्रींच्या तुकाराम महाराजांवरच्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक

2023-03-18 109

'महाराष्ट्राच्या भूमीवरती जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्याबद्दल जे वक्तव्य त्या बागेश्वर महाराजांनी केलं ते मन दुखवणारं आहे' असं वक्तव्य करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बागेश्वर महाराजांचा निषेध केला. 'तुम्ही त्याला बाबा म्हणतात मी त्यांना बाबा म्हणत नाही. त्या बागेश्वरच्या पुऱ्या खानदानाची अक्कल तुकारामाच्या पायाच्या नखा एवढी पण नाहीये. कुठे तुकाराम महाराज आणि कुठे हा बागेश्वर?' अशा शब्दांत आव्हाड यांनी टीका केली. त्याचसोबत 'काही जणांना हौस असते अशा लोकांना मोठा करायची, मतांची भीक जेव्हा मत पडणार नाहीत असा दिसायला लागला की मग असं काही थोतांड करायची सवय असते लोकांना' असे वक्तव्य करत भाजपावर निशाणासुद्धा साधलाय.

Videos similaires