Abdul Sattar: 'पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जाणार'; कृषिमंत्री सत्तारांचे आश्वासन

2023-03-18 1

बीडमध्ये कृषी विभागाअंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य मिलेट दौडचे उद्घाटन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलात या दौडला कृषिमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. दौडमध्ये स्वतः कृषिमंत्र्यांनी देखील सहभाग घेतला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना 'सध्या राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नुकसान झाले, त्याचे लवकरच पंचनामे होतील आणि कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही' असे आश्वासन सत्तारांनी दिले.

Videos similaires