दौंड तालुक्यात शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांच्या आभाराचे बॅनर लावण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर कथित 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या विरोधात दौंड शहरात मोर्चा निघाला होता. त्यानंतर दौंड तालुक्यात संजय राऊतांच्या आभाराचे बॅनर लागले आहेत. कर नाही तर डर कशाला चौकशीला सामोरे जा, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या वतीनं जाहीर आभार, अशा अशयाचे बॅनर शेतकरी सभासदांनी दौंड शहरात ठिकठिकाणी लावले आहेत.
#SanjayRaut #RahulKul #Shivsena #Daund #BJP #DevendraFadnavis #EknathShinde #ST #Banner #KiritSomaiya #FarmersMarch #Farming #Politics #SaiResort #Maharashtra