Bihar Vidhan Sabha: बिहार विधानसभेत भाजपाच्या लखिंद्र पासवान यांनी तोडला माईक; विरोधकांचा आरोप
र विधानसभेत दररोज गदारोळ पाहायला मिळत आहे. नुकतीच माईकच्या मुद्द्यावरून भाजपा आणि आरजेडी नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आठव्या दिवशी भाजप नेते लखिंद्र पासवान यांना दोन दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी माईक फोडल्याचा आरोप त्यांच्यावर केला. या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपाचे विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांच्यावर हल्लाबोल केला.