खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर काही सवाल उपस्थित केले. ते म्हणाले की, 'आज मी सभागृहात आल्यानंतर एका मिनिटात त्यांनी सभागृह तहकूब केलं, मला आशा आहे की, ते मला उद्या बोलू देतील, कारण मला माझी बाजू मांडायची आहे, काही दिवसांपूर्वी मी संसदेच्या सभागृहात नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्या संबंधांबद्दल जे भाषण केलं, अनेक प्रश्न विचारले, पण ते भाषण संसदेच्या रेकॉर्डवरून हटवलं. भारतीय लोकशाही कार्यरत असती, तर मी संसदेत माझे म्हणणे मांडू शकले असतो" याचसोबत 'सरकार मला संसदेत बोलू देईल असं वाटत नाही' असेही राहुल गांधी म्हणाले.