विधिमंडळ अधिवेशनातील भाषणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेतकरी आत्महत्या, रोजगार, महिला, वंचितांच्या प्रश्नांवरून शिंदे-फडणवीस सरकारवर मंगळवारी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी जयंत पाटील यांनी राज्य सरकार हजार कोटी रुपये फक्त जाहिरातीवर खर्च करीत असेल तर राज्याचे भविष्य अवघड असल्याची खंत व्यक्त केली. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील कवितेच्या माध्यमातून त्यांनी टोले लगावले. पाटलांच्या या कवितेनंतर सभागृहात एकच हशा पिकला.
#jayantpatil #devendrafadnavis #shayari #mahavikasaghadi #bjp #vidhansabha #maharashtra #hwnewsmarathi