अमरावतीच्या बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी पाण्याच्या प्रश्नासाठी मंगळवारी विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजळ आमरण उपोषणाला केले होते. बाळापूर मतदारसंघातील खाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रकल्प कार्यान्वित होणार होता, मात्र काही कारणामुळे तो बंद झाला. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु व्हावे, यासाठी नितीन देशमुख विधानभवनाच्या आवारात उपोषणाला बसले होते. पण 'अधिवेशन संपण्याच्या अगोदर जी स्थगिती आहे ती रद्द करू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांना दिलेली आहे आणि यावरूनच यांनी उपोषण मागे घेतले आहे' असे वक्तव्य करत त्यांनी हे उपोषण मागे घेतले आहे