शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी अनेक तरुणांना अटक केली जात आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. हा काद्याचा गैरवापर आहे. मी दिल्लीत असल्याने ते प्रकरण नेमंक काय आहे, हे मला माहिती नाही. पण जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो व्हिडीओ खरा की खोटा हे आधी तपासलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
#SanjayRaut #ShitalMhatre #PrakashSurve #ViralVideo #EknathShinde #Shivsena #BJP #VaibhavNaik #VinayakRaut #Congress #BhushanDesai #SubhashDesai #MNS #Politics #KalyanDombivli #KDMC