'नाफेडने पिंपळगाव, लासलगाव बाजार समितीत कांद्याची खरेदी करावी. मुंबईला आज ४० रुपये किलो कांदा आणि इथे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. कांद्याला भाव वाढतात त्यावेळी निर्यात का बंद करतात? त्यावेळी शेतकऱ्यांना चार पैसे मिळू द्या. असा सवाल राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी भाजपा सरकारला केला. '१२ हजार वर्षाला म्हणजे महिन्याला १ हजार मिळणार म्हणजे ही थट्टाच असून मोदींनी २०१४ साली नाशिकमध्ये शेतकऱ्यांना दुप्पट नफा मिळेल, असं सांगितलं. टोलवाटोलवी करू नका, त्यांना अनुदान द्या' अशी मागणीही भुजबळांनी यावेळी केली.